Ad will apear here
Next
पंढरपूर येथे बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग


सोलापूर : ‘रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी प्रथमच बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात सुरू करण्यात आला असून, यामध्ये सुमारे ११५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत,’ अशी माहिती प्रकल्प प्रमुख पांडुरंग सोलनकर यांनी दिली.

दरवर्षी हा उन्हाळी वर्ग सातारा येथे भरवण्यात येतो; मात्र सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जिल्ह्यातच चांगल्या ठिकाणी सोय व्हावी म्हणून संस्थेच्या मध्यविभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष संजीव पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून यंदा प्रथमच हा उन्हाळी वर्ग पंढरपुरात सुरू करण्यात आल्याचे सोलनकर यांनी सांगितले.

हा विषेश उन्हाळी वर्ग इयत्ता आठवी व नववीमध्ये ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी घेण्यात आला आहे. हा वर्ग निवासी असून, यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चहा, नाष्टा, भोजन व निवासाची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. या वर्गासाठी ‘रयत’च्या रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दोन विद्यार्थी, भोसे शाळेतील बारा, भाळवणी शाळेतील आठ, पुळूज शाळेतील चार, पिलीव शाळेतील सहा, घोटी शाळेतील तीन, फळवणी शाळेतील दहा, वरवडे शाळेतील दोन, अकोला-वासूद शाळेतील तेवीस, वांगी क्रमांक एक शाळेतील दोन, बोरगाव शाळेतील सतरा, मरवडे शाळेतील पाच, चिखलठाण शाळेतील सात, महुद शाळेतील दोन, रिधोरे शाळेतील एक, मांजरी शाळेतील सात, शिंदेवाडी शाळेतील दोन अशा एकूण ११५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये ७८ मुली व ३७ मुलांचा समावेश आहे.

‘रयत’च्या अकोला-वासूद, बोरगाव व भोसे या तीन शाळेत ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेले दहापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थांचे रयत शिक्षण संस्थेत विषेश कौतुक होत आहे. या वर्गाला १४ मेपासून सुरुवात झाली असून, ते पाच जूनपर्यंत चालू राहणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना ‘रयत’च्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. मीना जाधव हे मोफत वैद्यकीय सुविधा देत आहेत.

हा वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख सोलनकर, पंढरपूर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गोसावी, केंद्र प्रमुख एम. के. निकम, वरिष्ठ लेखनिक शामराव बागल, के. व्ही. रेडे, एस. डी. लेंडवे, एस. जी. जरे, एल. डी. काळे, एस. के. जाधव हे प्रयत्न करीत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZLEBO
Similar Posts
‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’ सोलापूर : ‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे,’ असे प्रतिपादन सुप्रभात ग्रुपचे सदस्य सूर्यभान चव्हाण यांनी केले.
सोलनकर यांचा गुणवंत रयत सेवक म्हणून सन्मान सोलापूर : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे आदिवासी आश्रमशाळा प्रकल्पाधिकारी पी. एन. सोलनकर यांचा गुणवंत रयत सेवक म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यविभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष संजीव पाटील होते.
पाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८७.०७ टक्के लागला. या विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी भोसे (क.) केंद्रात चमकले. त्यामुळे या विद्यालयाने गुणवत्तावाढीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
शिवशरण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोलापूर : शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे अनवली (ता. पंढरपूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. शिवशरण यांचा ग्रामस्थ व प्रशालेतर्फे सेवानिवृतीनिमित्त नुकताच सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language